Navratri Pudhari
सातारा

Shardiya Navratri 2026: यंदा नवरात्रौत्सव राहणार दहा दिवसांचा, घटस्थापनेचा मुहूर्त काय?

navratri 2026 10 days: यंदा नवरात्रौत्सव राहणार दहा दिवसांचा का?

पुढारी वृत्तसेवा

Navratri 2026 10 Days

कराड : यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असणार आहे. यंदा दि. ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव साजरा होणार असून, त्यासाठी सर्वत्र तयारीला वेग आला आहे. सलग दुसऱ्यावर्षी नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असणार आहे. याच कारण काय हे जाणून घेऊया...

2026 मध्ये नवरात्रोत्सव 10 दिवसांचा का? navratri 2026 10 days

तिथीच्या क्षयवृद्धीमुळे नवरात्रोत्सव कधी आठ किंवा दहा दिवसांचा साजरा होतो. यंदा सप्तमी तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असणार आहे. गेल्या वर्षीही म्हणजेच २०२५ मध्ये तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्रोत्सव दहा दिवसांचा होता.

2026 मध्ये घटस्थापना- दसरा कधी आहे? navratri 2026 start date and end date

आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. यंदा रविवारी (दि. ११) नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असून, याच दिवशी घटस्थापना केली जाणार आहे. तर दसरा २० ऑक्टोबरला आहे.

घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे? ghatasthapana 2026

या दिवशी दिवसभर वैधृति योग असला तरी पहाटे ४ वाजून ५६ मिनिटांपासून दुपारी १ वाजून ३५ मिनिटांपर्यंत कधीही घटस्थापना करता येईल.

दोन स्वतंत्र माळा का अर्पण कराव्यात?

नवरात्रोत्सवात देवीला रोज एक माळ अर्पण करण्याची प्रथा आहे. यंदा नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असल्याने रोज एक याप्रमाणे माळा अर्पण कराव्यात. तिथीची वृद्धी असल्याने दोन दिवसांच्या दोन स्वतंत्र माळा देवीला अर्पण कराव्यात. अनेकजण नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवस उपवास करतात. मात्र, काही कारणास्तव नऊ दिवस उपवास करणे शक्य नसल्यास नवरात्रोत्सवाच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास केला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT