सातारा

Satara : सातारा पोलिसांच्या सोसायटीत सत्तांतर; परिवर्तन-सहकार पॅनेल विजयी

backup backup

सातारा; पुढारी वृत्तसेवा : गेले महिनाभर सातारा जिल्हा पोलीस को-ऑप.क्रेडीट सोसायटीच्या निवडणुकीची भरपूर चर्चा सुरु होती. संपूर्ण सातारा पोलीस दलासह जिल्ह्याचे त्याकडे लक्ष लागले होते. मंगळवारी मतदान झाल्यानंतर रात्री निकाल लागला असता सत्ताधिकारी प्रगती पॅनेलचा पराभव झाला. यामध्ये १५ – ० अशा फरकाने परिवर्तन-सहकार पॅनेल विजय झाले. यावेळी विजयी उमेदवार पोलिसांनी गुलाल उधळून जल्लोष केला. (Satara)

सातारा पोलीस सोसायटीमध्ये १५ संचालक आहेत. त्यासाठी ३ पॅनेलमध्ये थेट निवडणूक झाली. पोलिसांची सोसायटी असल्याने पोलिसांनी ती आपल्याकडे राखण्यासाठी प्रचाराचा धुरळा उडवला होता. जिल्ह्यातील १८०० पोलीस या सोसायटीचे सभासद असून या पंचवार्षिक निवडणूकीसाठी तब्बल १५४९ पोलीस मतदारांनी मतदान केले. मतदानाचा टक्का वाढल्याने या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होेते. (Satara)

पोलीस करमणूक केंद्रात मतपेट्या आणल्यानंतर सायंकाळी मतमोजणीला प्रारंभ झाला. यामध्ये परिवर्तन-सहकार या पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. याचे नेतृत्व पोलीस शरद बेबले व आनंदराव भोईटे यांनी केले. विजयी उमेदवार कांतीलाल नवघने, अविनाश चव्हाण, ऋतुराज शिंदे, विनोद गायकवाड सनी आवटे, अतुल कुंभार, पृथ्वी जाधव, संजय जाधव, जयश्री कदम, संग्राम फडतरे, आनंदराव भोईटे, ओमकार यादव, अनिता हिरवे, मोहन नाचन, अनिल पवार अशी नावे आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT