सातारा

Satara News : पवनचक्क्यांचे जिओ टॅगिंग करा; ना. शंभूराज देसाई

Shambhuraj Pachindre

सातारा; पुढारी वृत्तसेवा : कराड विमानतळाचे विस्तारीकरण आणि रात्रीच्या वेळी विमान सेवा सुरू करण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील पर्यटन, उद्योग वाढीला चालना मिळणार आहे. पाटण तालुक्यात 1 हजार 62 पवनचक्क्यांची नोंद असून त्या पवनचक्क्यांना ग्रामपंचायतींनी क्रमांक द्यावेत. याबाबत यंत्रणांनी दक्षता घ्यावी. ग्रामपंचायतीने पवनचक्क्यांचे क्रमांक देवून त्याचे जिओ टँगींग करावे, अशा निर्देश पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी आढावा बैठकीत दिले. (Satara News)

या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधिक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपवनसरंक्षक आदिती भारद्वाज, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, विमानतळ प्राधिकरणाचे विभागीय व्यवस्थापक संतोष नलावडे, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता जयंत शिंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (Satara News)

ना. देसाई म्हणाले, कराड विमानतळ विस्तारीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्याची असणारी 1 हजार 280 मीटरची धावपट्टी वाढवून ती 1 हजार 700 मीटर करण्यात येणार आहे. विस्तारीकरणासाठी 48 हेक्टरचे भूसंपादन झाले आहे. जवळपास 62 टक्के खातेदारांना भूसंपादन पोटी मिळणारा निधी शासनाने वितरीत केला आहे. एअरपोर्ट अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया यांनी निर्धारित केलेल्या नियमानुसार जी बांधकामे, टॉवर्स अडथळा निर्माण करणारी ठरतील ती अतिक्रमणे काढण्याबाबत कार्यवाही करावी. ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात येणार्‍या पवनचक्क्यांना क्रमांक देण्यात यावेत. पवनचक्की कंपन्यांनी शासनाचा कर चुकवेगिरी करू नये. यासाठी उभारण्यात आलेलया पवनचक्क्यामधून किती विद्युत निर्मिती होते याची तपासणी करण्यात यावी. कर थकबाकी असणार्‍या कंपन्यांना अंतिम नोटीस देवून विहित मुदतीत भरणा न झाल्यास कारवाई करावी. मोरणा गुरेघर प्रकल्पांतर्गत उजवा व डावा कालवा हा बंदिस्त पाईपलाईन करावयाचा आहे. या कामासाठी मंजुरी घेण्यात येईल. या प्रकल्पातील 261 कुटुंबाचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असून तो लवकरच सोडवण्यात येईल, असेही ना. देसाई यांनी सांगितले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT