नागपूर : शौचालयाच्या खिडकीतून महिलांचे व्हिडिओ काढणारा कला शिक्षक पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

नागपूर : शौचालयाच्या खिडकीतून महिलांचे व्हिडिओ काढणारा कला शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शिक्षकाने  शौचालयात महिलांचे व्हिडिओ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसरात 27 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील उद्योगपतीसह बडे राजकीय नेते मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले. दरम्यान दोन महिलांनी शौचालयातून कोणीतरी अज्ञात व्यक्ती त्यांचे व्हिडिओ काढत असल्याची तक्रार अंबाझरी पोलिसांकडे केली. पोलिसांनी तात्काळ खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजक यांच्याशी संपर्क साधून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एक व्यक्ती संशयास्पद आढळून आली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याचा मोबाईल तपासला असता मोबाईलमध्ये जवळपास वेगवेगळे २० अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केलेले आढळून आले. आरोपी मंगेश खापरे हा एका खासगी शाळेत कला शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात संशयित आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला असून याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

Back to top button