wari 2026  pudhari photo
सातारा

सेवाभाव व्यवस्थापनाचा आदर्श... माऊली-तुकोबारायांचा पालखी सोहळा!

सेवाभाव व्यवस्थापनाचा आदर्श... माऊली-तुकोबारायांचा पालखी सोहळा!

पुढारी वृत्तसेवा

कराड : सतीश मोरे

पंढरीचा वारकरी। वारी चुको नेदी हरी ।। पंढरीची वारी कशी सुरू होते, लाखो वारकऱ्यांच्या तहन्याची, जेवणाची आणि प्रवासाची व्यवस्था कोण करतो, कोण निमंत्रण देतो, निधी कुठून येतो, एवढी शिस्त कशी टिकते, असे अनेक प्रश्न प्रथमच वारी पाहणा-याच्या मनात निर्माण होतात. मात्र, वारी अनुभवली की या सर्व प्रश्नांची उत्तरे एका शब्दात मिळतात, श्रद्धा आणि स्वयंशिस्त, जगातील कोणत्याही धर्मात सलग अठरा दिवस लाखो लोक पायी चालत सहभागी होप्यारा असा सोहळा आढळत नाही, म्हणूनच संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा केवळ भक्तीचा नव्हे, तर व्यवस्थापनाचा जगातील सर्वोत्तम नमुना आहे. त्यामुळे वारकरी समाजालाच खरा 'मैनेजमेंट गुरू' म्हणणे योग्य ठरेल.

आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊलींची आणिदेहूहून संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होते. दोन्ही पालख्यांसोबत राज्यभरातील हजारों दिख्चा सहभागी होतात. प्रत्येक दिडील अॅडेकरी, वीणेकरी, टाळकरी, चोपदार, सेवेकरी आणि शेकडो वारकरी असतात. दारी सुरू होण्याच्या दोन-तीन महिन्यांपूर्वीच प्रत्येक दिंडीत नियोजन सुरू होते. निवास, भोजन, वाहतूक, तंबू, धान्य, स्वयंपाक आणि इतर सर्व व्यवस्था दिडीच स्वतः करते. वारीची शिस्त हे तिचे सर्वात मोठे वैशिष्ट्य.

सकाळी ७ वाजता पालखी मार्गस्थ झाल्यानंतर दुपारचे भोजन आणि सार्यकाळचा विसावा यासाठी निश्चित वेळा असतात. पालखी थांबेपर्यंत कोणतीही दिड़ी थांबत नाही. रस्त्याच्या कडेला कितीही सेवा सुरू असली तरी वारकरी रांग सोडत नाहीत. प्रत्येक दिंडीतील चोपदार शिस्तीचर बारकाईने लक्ष ठेवतो. त्यामुळे लाखो लोक चालत असूनही गौधळ किंवा अव्यवस्था दिसत नाही. वारीतील व्यवस्थापनाचा खरा वमत्कार मुक्कामाच्या ठिकाणी दिसतो. पहाटेच सामानाची वाहने पुढील मुक्कामाकडे रवाना होतात. तेथे पोहोचल्यावर सेवेकरी तंबू उभास्तात, स्वयंपाकाची तयारी करतात आणि वारकरी पोहोचण्यापूर्वी संपूर्ण पालखीतळ तयार होतो. दुपारी वारकरी भोजन करतात, सायंकाळी मुक्कामी पोहोचतात आणि रात्री त्याच तंबूत विश्रांती घेतात.

पहाटे पुन्हा तोच संसार आवरून पुढील मुक्कामासाठी प्रवास सुरू होतो. अनेक दिंड्यांचा भोजनाचा मेनू आणि मुक्कामाची जागा वर्षानुवर्षे तीच आहे. हजारो वारकरी जेवतात; पण आर कमी पडत नाही. राहण्यासाठी तंबू कमी पडत नाहीत. कारण प्रत्येक वारकरी स्वतः सेवक असतो व प्रत्येक सेवेकरी स्वतःला माऊलींच्या कार्याचा भाग समजतो. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणतेही व्यावसायिक इव्हेंट नाहीत.

सर्वांची एकच ओळख असते वारकरी

निम्खाण नाही, प्रसिद्धी नाही, मानधन नाही, तरीही लाखो लोक स्वतःहुन सहभागी होतात. जाती, धर्म, श्रीमंती, गरिबी, पद किंचा प्रतिष्ठा यांचे कोणतेही भेद येथे राहत नाहीत. सर्वांची एकच ओळख असते वारकरी. सुमारे चार लाख वारकरी दररोज एका गावातून दुसन्या गावाकडे मार्गक्रमण करतात. कोणालाही उपाशी राहावे लागत नाहीं, कोणी बेघर राहत नाही. संकट आले तर मदतीसाठी अनेक हात पुढे येतात. ही व्यवस्था कोणाच्या आदेशावर नव्हे, तर श्रद्धेच्या बळावर चालते.

जगभरातील व्यवस्थापन संस्थांनी अभ्यासावा असा सोहळा

म्हणूनच माऊली पालखी सोहळा हा केवळ धार्मिक उत्सव नाही; तो स्वयंशिस्त, सेवाभाव, समर्पण आणि व्यवस्थापनाचा जिवंत आदर्श आहे. जगभरातील व्यवस्थापन संस्थांनी अभ्यासावा असा हा सोहळा आहे. आधुनिक व्यवस्थापनाची अनेक तत्वे वारकरी परंपरेने शेकडो वर्षांपूर्वी प्रत्यक्ष आचरणात आणली आहेत.

या सुखाकारणे देव वेडावला। वैकुंव मोडोनी वारीसी आला ।।

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT