Satara heavy Rainfall
सातारा : यंदा मे महिन्यातच मान्सूच्या पावसास सुरवात झाली आहे. पावसाचे प्रमाण तर इतके आहे की रस्ते, पूल, झाडे, अक्षरक्षा वाहून जात आहे. जुलै महिन्यासारखे नद्यांचे पाणी वाढत आहे. सातारा जिल्ह्यात अक्षरशा पावसाने धुमाकूळ घातला आहे प्रामुख्याने बघायला गेलं तर फलटण, माण, खटाव,महाबळेश्वर, सातारा या भागात मुसळधार पाऊस पडत आहे.
माण तालुक्यात पावसाने रस्ताच वाहून गेला. यावरुन दुचाकी चालवणे महामुश्किल झाले. यावर शक्कल लढवत एका पठ्ठयाने चक्क दुचाकीच डोक्यावर घेतली व घरचा रस्ता धरला. त्याचा हा व्हिडीओमुहे पावसाची भीषणता समोर येते. हा व्हिडीओ आता व्हारल होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील कुळकजाई गावात पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः दैना झाली आहे. रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की, एका युवकाला आपली दुचाकी खांद्यावर घेऊन रस्ता पार करावा लागला. या गावाला जोडणारा रस्ता पावसाने अक्षरक्षः चिखलाने भरला आहे. त्यामुळे नेहमी आपण दुचाकीवरून रस्ता पार करणाऱ्या युवकाला दुचाकीच खांद्यावर घेण्याची वेळ आली. पावसामुळे येथील रस्ते पूर्णतः चिखलयुक्त आणि खड्ड्यांनी भरलेले आहेत. अशा परिस्थितीत वाहन चालविणे अशक्य बनले असून, नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याबाबत संबंधित विभागाने त्वरित दखल घ्यावी आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
महाराष्ट्राचा मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर येथील वेण्णा नदीवरील लिंगमळा धबधबा ओसांडून वाहू लागला आहे. महाबळेश्वर मध्ये विक्रमी पाऊस पडला असून रात्री 25 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. महाबळेश्वर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढला असून परिसरातील शेतीसह नदी, नाले, दुथडी भरून वाहू लागले आहेत. प्रसिद्ध असणारा लिंगमळाचा धबधबा फेसाळला असून याचे रौद्ररूप पाहण्यासाठी पर्यटक महाबळेश्वर येथे गर्दी करू लागले आहेत.