सातारा

सातारा : यवतेश्वर घाटात दरड कोसळली

backup backup

सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा शहराच्या पश्चिमेस गेल्या आठ दिवसापासून पावसाची संततधार सुरु आहे. कास, ठोसेघर परिसरात दरड कोसळण्याचे सत्र सुरु आहे. शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास यवतेश्वर घाटात दरड कोसल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती. याच दरम्यान साताऱ्याकडे येणारा एक दुचाकीस्वार जखमी झाला आहे.

गेल्या आठ दिवसापासून जिल्हयात पावसाने हजेरी लावली आहे. पूर्वेस पावसाची उघडडिप असली तरी पश्चिमेस मात्र, पावसाची संततधार सुरुच आहे. ठिकठिकाणी झाडे, दरड कोसळण्याचा घटना सुरु आहेत. शनिवारी रात्री ८ च्या सुमारास यवतेश्वर घाटात दरड कोसळली. मोठमोठे दगड रस्त्यात आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम, सातारा तालुका पोलीस व प्रवास  करणाऱ्या वाहनधारकांनी या दगडी बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. दरम्यान यात यवतेश्वरकडून साताऱ्याकडे येत असणाऱ्या दुचाकीस्वार या घटनेत जखमी झाला आहे.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT