सातारा

सातारा : ऊसतोड मजुराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अविनाश सुतार

वडूज : पुढारी वृत्तसेवा : खटाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गजानन अनंता खैरे (रा. कल्याण, ता. मेहकर, जि. बुलडाणा) या संशयित आरोपीला वडूज पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत वडूज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बीड जिल्ह्यातून एक कुटुंब पडळ व गोपुज या कारखान्याची ऊसतोड करण्यासाठी आले होते. ते खटाव तालुक्यातील एका गावातील शिवारात कोपी टाकून राहत होते. त्यांच्या कोपीशेजारी राहणारे संशयित आरोपी गजानन खैरे हा ऊस तोडणीसाठी राहत होता.

सोमवारी (दि.२) कारखाना बंद झाल्याने पीडित कुटुंब गावाकडे जाण्यासाठी आवराआवर करत होते. दुपारी साडे तीनच्या सुमारास मुलीचे वडील कामानिमित्ताने गावात गेली होते. यावेळी घरामध्ये पीडित मुलीस गजानन खैरे यांनी मोबाईल दाखवतो, असे सांगून बाहेर घेऊन गेला. मुलीचे वडील घरी आल्यावर मुलगी कुठे आहे, हे पाहण्यासाठी गेले असता जवळच असलेल्या आंब्याच्या झाडाखाली जखमी अवस्थेत मुलगी दिसून आली.

त्यानंतर मुलीला याबाबत विचारले असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला. याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दीक्षित यांनी घटनास्थळी जाऊन आरोपीस ताब्यात घेतले. वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT