मेढा: निलेश ठमके
सध्या जे मीटर आहेत ते बदलून त्या जागी नवीन स्मार्ट प्रिपेर्ड मीटर सर्वत्र बसविले जात आहेत.त्या विरोधात बुधवार दि.15 ऑक्टोबर रोजी रोहा महावितरण वितरण कार्यालयावर धडक मोर्चा निघणार असून या मोर्चात नागरिकांनी बहुसंख्येने सामील व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद वार पक्षाचे तालुका अध्यक्ष तुषार खरीवले यांनी केले आहे.
विजेचे जुने मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचा सपाटा सर्वत्र सुरू असून त्याला विरोध देखील होत आहे. परंतु त्या विरोधाला न जुमानता महावितरणचे ठेकेदार बिनदिक्कत स्मार्ट मीटर बसवत आहेत.विज हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडित असा महत्वाचा विषय आहे.मात्र याच वीजबद्दल सातत्याने सामान्य जनता भरडली जात आहे.या विरोधात कमालीचा संताप व्यक्त केल होता.
सदर मोर्चा हा सर्वहार जन आंदोलन व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे यावेळी सर्वहार जनआंदोलनाच्या नेत्या उल्काताई महाजन, शेकाप महिला संघटक चित्रलेखा पाटील,काँग्रेसच्या ॲड. श्रद्धा ठाकूर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मनसे जिल्हाध्यक्ष अमोल पेणकर, रोहा तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनीलशेठ देशमुख,सर्वहार जनआंदोल जिल्हाध्यक्ष सोपानजी सुतार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख नितीन वारंगे,शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस शिवराम महाबले, उपाध्यक्ष पांडुरंग वाघमारे, कार्याध्यक्ष चंद्रकांत गायकवाड हे उपस्थित राहणार आहेत. मोर्चाच्या निमित्ताने गावोगावी जनतेमध्ये जनजागृती करण्याचे काम राष्ट्रवादीने आतापासून सुरु केलेले आहे.
आधीच महागाईने जनता होरपळत आहे .यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज प्रत्येक कुटुंबाने महिन्याला किराणा भरायचा की दोन चार हजार लाईट बिल भरायचा हा प्रश्न गरीब माणसाला पडला आहे.त्यामुळे आता न्याय हक्कासाठी लढण्याची गरज निर्माण झाली आहे. महावितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर बसाविले जात आहेत.सद्या चालू स्थितीत असलेले मिटर बदलून त्या ठिकाणी स्मार्ट प्रिपेर्ड मीटर बसविले जात आहेत.जर हे मीटर बदलले तर भरमसाठ वीज बिले येणार आहेत यामध्ये जनतेचे कंबरडे मोडले जाणार आहे. या विरोधात आंदोलन केल्याशिवाय जनतेला पर्याय नाही त्यामुळे या हुकूमशाही विरोधात वेळीच आवाज उठवला नाही तर जनतेचे नुकसान होईल म्हणून आपल्या न्यायहक्कासाठी 15 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या मोर्चास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे.तुषार खरीवले अध्यक्ष रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट