सातारा

सातारा: सूरज बोडरेसह १२ जणांवर मोक्काची कारवाई

अविनाश सुतार

सातारा: पुढारी वृत्तसेवा: फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या सूरज बोडरेसह त्याच्या टोळीतील १२ जणांवर संघटित गुन्हेगारी (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक समोर शेख यांनी ही कारवाई केली. यामुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.

संशयित टोळीवर खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, जबर दुखापत घडवून आणण्याच्या प्रयत्नासह दरोडा, जबरी चोरी, जबर दुखापत, बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण, शिवीगाळ, दमदाटी, अपहरण, आर्म अॅक्ट अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. टोळी प्रमुख सुरज बोडरे याने त्याच्या टोळीची दहशत पसरविण्यासाठी फलटण तालुक्यातील इतर गुन्हेगारी टोळीतील सदस्यांना एकत्र करुन दहशत पसरविल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे फलटण पोलिसांनी त्यांचा प्रस्ताव तयार केला. त्यानुसार एसपी कार्यालयाकडून आयजी कार्यालयकडे प्रस्ताव पाठवला. त्यास मंजुरी मिळाली आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT