Satara landslide : सातारा-ठोसेघर मार्गावर दरड कोसळली, एकेरी वाहतूक सुरू File Photo
सातारा

Satara landslide : सातारा-ठोसेघर मार्गावर दरड कोसळली, एकेरी वाहतूक सुरू

या परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. त्‍यामुळे डोंगरावरून दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Landslide on Satara-Thoseghar road, one-way traffic started

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा - ठोसेघर मार्गावर बोरणे गावानजीक अतिवृष्टीने दरड कोसळली. या मार्गावरील वाहतूक रात्री उशिरापासून बंद होती. रात्री मुक्कामी असलेल्या जांभे चाळकेवाडी राजापुरी या गाड्या पलीकडेच तर अलीकडच्या एसटी बसेस अलीकडेच अडकल्‍या होत्या.

दुधाचे टेम्पो ही रस्त्यावरच अडकून पडले होते. यामुळे प्रवासी, विद्यार्थी तसेच मुंबईला जाणारे लोक गाडीतच अडकले होते. प्रशासनाने तात्काळ दरड हटवण्याचे काम सुरू केले आहे. दरम्‍यान या मार्गावर एकेरी वाहतूक सुरु आहे. या परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. त्‍यामुळे डोंगरावरून दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे.

दरम्‍यान सातारा-ठोसेघर या मार्गावर बोरणे गावानजिक भला मोठा दगड रस्‍त्‍यावर येउन पडला आहे. यावेळी या मार्गावरून एखादे वाहन गेले असते तर मोठा अपघात घडला असता. मात्र सुदैवाने या ठिकाणी कोणतीही घटना घडलेली नाही. प्रशासनाकडून मार्गावरील दरड हटवून रस्‍ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT