सातारा : इम्तियाज मुजावर महाबळेश्वर तालुक्यात महाबळेश्वर व पाचगणीत अवकाळी पावसाने गुरूवारी धुमाकूळ घातला. महाबळेश्वर मध्ये गारपीट पडल्याने जमिनीवर गारांचा खच पडल्याचे दिसून आले.
गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वर परिसरातील वातावरण ढगाळ असून, सोसाट्यांचा वारा विजांचा कडकडाट ढगांचा मोठमोठाला आवाज यामुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघाले होते.
यातच गुरूवारी दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन मुसळधार पाऊस पडला. या पावसाबरोबरच गारपीट मोठ्या प्रमाणात झाली. या गारपिटीने स्ट्रॉबेरी पिकाचं नुकसान झालं, तर महाबळेश्वर मध्ये अशा पद्धतीने गारांचा खच दिसून आला.
हेही वाचा :