सातारा

सातारा : ओबीसी आरक्षण प्रश्‍नी राज्य शासनाच्या निषेधार्थ भाजपचे साताऱ्यात रास्ता रोको आंदोलन

अविनाश सुतार

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि नेत्यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केल्यामुळे ओबीसी समाजाला आरक्षण मिळू शकलेले नाही. मध्य प्रदेश सरकारला जे जमले ते महाराष्ट्र सरकारला का जमले नाही, असा सवाल करत ओबीसी आरक्षण देण्याची ठाकरे सरकारची मानसिकताच नाही, असा आरोप सातारा भाजपच्या वतीने आज (शनिवार) करण्यात आला.

ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आंदोलन आणि रास्ता रोको करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT