A two-wheeler-tempo collided head-on in the farm boundary
शेते येथे अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.  Pudhari Photo
सातारा

शेतेच्या हद्दीत दुचाकी-टेम्पोची समोरासमोर धडक

पुढारी वृत्तसेवा

पाचगणी : पुढारी वृत्तसेवा

कुडाळ- करहर रस्त्यावर शेते, ता. जावली गावच्या हद्दीत शनिवारी दुचाकी व टेम्पो या दोन वाहनांची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला आहे. तर पाठीमागे बसलेला युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची नोंद मेढा पोलिस ठाण्यात झाली आहे.

हर्षित सदाशिव शेट्टी (वय 32, रा. मुंबई) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर साहिल मंगेश शिंदे (वय 23) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी टेम्पो चालक सुरज रमेश भिलारे (रा. शेते, ता. जावली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकी चालक हर्षित शेट्टी हा करहरच्या दिशेने जात होता तर टेम्पो चालक सूरज हा कुडाळकडे निघाला होता. दोन्ही वाहने शेते गावच्या हद्दीत आली असता दुचाकी व टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये हर्षित हा जागेवरच ठार झाला. तर त्याचा मित्र साहिल शिंदे हा गंभीर जखमी झाला आहे.

SCROLL FOR NEXT