कोरेगाव : पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव नगरपंचायतीने घोषित केलेला अन्यायकारक विकास आराखडा रद्द होण्यासाठी आज सोमवारी (दि.२० ) रोजी 'कोरेगाव बंदला माझा पाठिंबा' असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, आता विकास आराखड्याविरोधात कोरेगावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
आज सोमवारी आठवड्याचा बाजार असल्याने व्यापाऱ्यांनी बंदला उत्सुर्त प्रतिसाद दिला आहे. कोरेगावातील सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे विकास आराखड्याविरोधात नागरिकांचा विरोध वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरेगावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हेही वाचा :