honesty  file photo
सांगली

Sangli Zilla Parishad school girl honesty|जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीचा प्रामाणिकपणा

Sangli Zilla Parishad school girl honesty - सापडलेले दोन तोळ्यांचे गंठण मूळ मालकाला परत

पुढारी वृत्तसेवा

सोनी : रस्त्यावर सापडलेले दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण कोणताही मोह न ठेवता मूळ मालकाला परत करत, जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ मधील इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी राजनंदिनी सोमनाथ तेली हिने प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण केला आहे.

गावातून जात असताना राजनंदिनीला सोन्याचे गंठण सापडले. तिने तत्काळ ही माहिती पालकांना दिली. दरम्यान, गावातील उमेश जाधव यांनी गंठण हरवल्याचे व्हॉट्स अॅप स्टेटस ठेवले होते. हे स्टेटस राजनंदिनीच्या पालकांच्या निदर्शनास आल्यावर, सापडलेले गंठण जाधव कुटुंबीयांचेच असल्याची खात्री पटली. त्यानंतर ते गंठण भाग्यश्री जाधव यांच्या स्वाधीन करण्यात आले.

अरविंद पाटील दागिना सुरक्षित परत मिळाल्याबद्दल भाग्यश्री जाधव यांनी राजनंदिनी व तिच्या पालकांचे आभार मानले. राजनंदिनीने लहान वयात दाखवलेल्या या सचोटीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामपंचायत केला. यांनी तिला रोख पारितोषिक देऊन तिच्या या कृतीचा गौरव

यावेळी ग्रामपंचायत सदस्य गजानन पाटील, किरण माळी, प्रवीण पवार, सागर नरटे, शेखर जाधव यांसह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. राजनंदिनीच्या या कृतीतून विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणाचा धडा घ्यावा, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT