R. R. Patil-Nana Patekar|नाना आणि आबा

R R Patil and Nana Patekar bond memories - आठवणींच्या पानांवरची दिलखुलास मैत्री माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि नाना पाटेकर एका कार्यक्रमात.
R R Patil and Nana Patekar
R R Patil and Nana Patekar bond memories
Published on: 
Updated on: 

काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि नंतर ती केवळ आठवण बनून राहत नाहीत, तर आपल्या आयुष्याचा एक भाग बनून जातात. माझ्या आबांच्या आयुष्यात असंच एक खास नातं होतं... नाना पाटेकर. आबा म्हणजे आमच्यासाठी घरातला आधार. बाहेरच्या जगासाठी ते आर. आर. पाटील, माजी गृहमंत्री आणि मोठे राजकीय नेते होते; पण घरात ते फक्त आमचे आबा. त्यांच्या आयुष्यात अनेक माणसं आली. मात्र काही माणसांशी त्यांचं नातं पद, राजकारण किंवा कामापुरतं नव्हतं. ते मनापासून जुळलेलं होतं. नाना त्यापैकीच एक.

ना आणि आबा दोघेही आपल्या क्षेत्रात मोठे न होते; पण एकमेकांसमोर आले की त्या मोठेपणाचा कुठेही आव नव्हता. कधी समाजकारणावर, कधी राजकारणावर, कधी चित्रपटांवर, तर कधी अगदी साध्यासुध्या विषयांवर त्यांच्या गप्पा रंगायच्या. त्यांच्या बोलण्यात परस्परांबद्दल आदर होता; त्याहून महत्त्वाचं म्हणजे मोकळेपणा होता. ते घरी आले की वातावरणच बदलून जायचं. औपचारिक भेटीऐवजी घरच्या माणसाची भेट असायची.

बसणं, गप्पा मारणं, जेवणं आणि पुन्हा बराच वेळ बोलत राहणं... आबा आणि नाना एकत्र असताना त्यांच्या गप्पा ऐकण्याची वेगळीच मजा असायची. दोघांचाही स्वभाव स्पष्ट होता. मनात असेल ते बोलायचं. चर्चा रंगायची.

आबांच्या राजकीय प्रवासात अनेक चढ-उतार आले. पदं आली, सत्ता आली आणि गेली. मात्र नानांसोबतच्या नात्यात या सगळ्याचा कधीच अडसर आला नाही. नाना आबांकडे केवळ राजकीय नेता म्हणून, तर आबाही नानांकडे केवळ प्रसिद्ध अभिनेता म्हणून पाहत नव्हते. दोघे एकमेकांना माणूस म्हणून ओळखत होते. नानांनी आबांबद्दलच्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत. त्यांच्या शब्दांतून आबांबद्दलचा जिव्हाळा जाणवतो. नाना जेव्हा आबांची आठवण सांगत, तेव्हा त्यात केवळ एका मोठ्या व्यक्तीची नव्हे, तर एका मित्राची आठवण असते. नाना आणि आबांचं नातं होतं... प्रसिद्धीच्या, राजकारणाच्या आणि पदांच्या पलीकडे गेलेलं, दोन दिलखुलास माणसांचं आणि दोन मित्रांचं नातं.

- आ. रोहित पाटील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news