Transgender youth Death  Pudhari
सांगली

Sangli Crime | विट्यात तृतीयपंथी तरुणाने मंदिरात गळफास घेऊन जीवन संपविले

गांधीनगर परिसरात एका २३ वर्षीय तृतीयपंथी तरुणाने राहत्या घराशेजारील मंदिरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली

पुढारी वृत्तसेवा

Transgender youth Death

विटा : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरात एक अतिशय खळबळजनक घटना समोर आली आहे. गांधीनगर परिसरात राहणाऱ्या एका २३ वर्षीय तृतीयपंथी तरुणाने राहत्या घराशेजारील मंदिरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटने मुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकले ले नाही.

पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण थोरात हा तृतीयपंथी तरुण मंगळवारी (दि. १४) रात्री उशिरा घराशेजारीच असलेल्या यल्लमा देवीच्या खोलीवजा मंदिरात गेला. तिथे ओढणीने गळफास लावून घेतला. विशेष म्हणजे, गळफास घेण्यापूर्वी त्याने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

या घटनेची माहिती मिळताच त्याचा भाऊ तुषार थोरात यांनी प्रवीणला उपचा रासाठी तात्काळ विट्याच्या ग्रामीण रुग्णालया त दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्या पूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. राजपूत यांनी या घटनेची माहिती विटा पोलीस ठाण्याला दिली. विटा पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. अधिक तपास चालू आहे.

दरम्यान मंगळवारीच सकाळी चारित्र्याच्या संशयावरून पतीने - पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केल्याचा प्रकार विट्यात घडला होता. यातील पती संश यित सोनल उर्फ अविनाश तुकाराम लोटके हा फरारी आहे. पाच वर्षांपूर्वीच या दोघांचा प्रेम विवाह झाला होता. याप्रकरणी मृत काजलची मावशी दीपाली शशिकांत साठे यांनी दिलेल्या फिर्यादीत अविनाशला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. तसेच स्वतः अविनाश ला तृतीयपंथीचा नाद असल्याने त्यास पत्नी काजल उर्फ श्रद्धा विरोध करीत होती. त्या वरून त्यांच्यात भांडणे, वादावादी होत होती. असे सांगितले जाते.

विट्याचे उपविभागीय पोलीस अधि कारी विपुल पाटील स्वतः या प्रकरणाचा तपास करीत आहेत. आता या घटनेचे गांभीर्य ओळखून सर्व बाबी तपासत आहेत. तसेच या अँगलनेही पोलिसांचा तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT