सांगली

सांगली : उमदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी अपघातात दोघेजण ठार

अविनाश सुतार

जत; पुढारी वृत्तसेवा : उमदी (ता.जत) पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या उमदी – पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकीची समोरासमोर झालेल्या धडकेत दोघेजण ठार झाले. ही घटना शनिवारी (दि.१५) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघाताची नोंद जत पोलिसांत झाली आहे. भीमराव मायाप्पा पडवळे (वय ५२, रा. शिवनगी ता. मंगळवेढा जि. सोलापूर) हे जागीच ठार झाले. इराप्पा तमाराया बिराजदार (वय, २२ रा. उटगी, ता.जत) या तरुणाला सांगली येथे उपचाराला नेत असताना कवठेमंहकाळ दरम्यान त्‍याचा मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी, शिवणगी येथील भीमराव पडवळे हे मोटरसायकल वरून पंढरपूर – विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरून शेवाळे वस्तीकडे जात होते. दरम्यान उटगी येथील युवक याच महामार्गावरून मंगळवेढ्याकडे जात होता. दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात भीमराव पडवळे हे जागीच ठार झाले. जखमी पडवळे यांना त्यांचे भाऊ बिरापा पडवळे यांनी जत ग्रामीण रुग्णालयात हलविले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सदाकाळे यांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.

इराप्पा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचाराकरिता सांगलीला नेत असताना रस्त्यातच कवठेमंहकाळ दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची भीषणता एवढी होती की, दोन्हीही दुचाकींचा चक्काचूर झाला. तपास जत पोलीस करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT