Raj Thackreay Eknath Shinde : राज ठाकरेंनी घेतली मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, वर्षा बंगल्यावर दीड तास चर्चा | पुढारी

Raj Thackreay Eknath Shinde : राज ठाकरेंनी घेतली मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, वर्षा बंगल्यावर दीड तास चर्चा

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Raj Thackreay-Eknath Shinde)यांची आज ( दि. १५ ) भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेचा ठाकरे गट आमने-सामने असणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

 शनिवारी ( दि. १५) दुपारी साडेतीनच्या सुमारास मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी राज ठाकरे वर्षा बंगल्यावर पोहोचले. या बैठकीमध्ये दीड ते दोन तास यां दोघांमध्ये चर्चा झाली. या बैठकीमध्ये मालमत्ता करारासंदर्भात आणि आरोग्यविषयक मुद्यांवर चर्चा झाली असल्याची प्राथमिक चर्चा आहे. मात्र या भेटीबाबत अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात देखील चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मी योग्य वेळी पक्षाची भूमिका मांडेन, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली होती. या भेटीमुळे आगामी काळात राज ठाकरे यांची भूमिका काय असेल यावर सध्या सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

ठाकरे गटासाठी ही अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट निवडणूक प्रतिष्ठेची लढाई असणार आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही शिवसेना गटाच्या नावामध्ये आणि चिन्हामध्ये बदल केला. अंधेरी पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा तात्पुरता निर्णय आयोगाने दिलेला होता. या पोटनिवडणुकीत भाजपाचा उमेदवार रिंगणात असल्याने शिंदे गटाचा याला पाठिंबा आहे. मात्र ठाकरे गटाला नवे नाव आणि चिन्ह जनतेसमोर आणणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाने सध्या या पोटनिवडणूकीसाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू केलेली आहे.

हेही वाचा

Back to top button