आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : टेंभुच्या बंदिस्त पाईपलाईनच्या आराखड्यात तांत्रिक कारणामुळे वंचित राहिलेल्या आटपाडी तालुक्यातील माडगुळे येथील शेतकऱ्यांना आमदार अनिलराव बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्यामुळे दिलासा मिळाला. सांगोला तालुक्याच्या हद्दीपर्यंत असलेल्या माडगुळेतील शेतकऱ्यांना पाणी देण्याचा मार्ग यानिमित्ताने निकाली निघाला.
आटपाडी तालुक्यात टेंभु योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनचे काम सुरू आहे. मुख्य पाईपलाईननंतर वितरण व्यवस्थेचे काम सध्या सुरू आहे. माडगुळे गावातील चिंध्यापीर परिसर आणि सांगोला तालुक्याच्या हद्दीत असलेल्या शेतकऱ्यांचे क्षेत्र मात्र तांत्रिक कारणामुळे पाईपलाईनपासुन वंचित होते.
शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांना आमदार अनिलराव बाबर यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. बाबर यांनी टेंभुच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधुन माडगुळे, चिंध्यापीर व परिसरातील शेतकऱ्यांवरील अन्याय दुर करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सुचना केल्या.
त्यामुळे चिंध्यापीर, माडगुळे येथील शेतकऱ्यांसाठीचे प्रत्यक्ष पाईपलाईनचे कामही सुरू झाले. माडगुळे, चिंध्यापीर व सांगोला तालुक्याच्या हद्दीत असलेल्या आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. या वंचित भागाला पाणी देण्याच्या पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, साहेबराव पाटील,सतिश विभुते, यशवंत खळगे,वसंत विभुते,किशोर जावीर व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झाला.
हेही वाचा;