सांगली : शहरातील डीजे चालकांची बैठक उपअधीक्षक विमला एम. यांनी घेतली. यावेळी पोलिस निरीक्षक संजय मोरे, सुधीर भालेराव, सूरज बिजली, वाहतूक शाखेचे मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते. (Pudhari File Photo)
सांगली

DJ Noise Limit Violation | ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास थेट कारवाई

डीजे चालकांना पोलिसांचा इशारा; सणांच्या पार्श्वभूमीवर सांगलीत बैठक

पुढारी वृत्तसेवा

सांगली : गणेशोत्सवाच्या काळात ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास डीजे जप्त करून चालकासह मंडळावर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलिस उपअधीक्षक विमला एम. यांनी दिला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहर पोलिस ठाण्यात डीजे चालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला सांगली शहरचे पोलिस निरीक्षक संजय मोरे, विश्रामबागचे सुधीर भालेराव, संजयनगरचे सूरज बिजली, वाहतूक शाखेचे मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते. ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही पोलिसांनी बैठकीत दिला.

या बैठकीत पोलिसांनी डीजे चालकांना कायद्याबाबत मार्गदर्शन केले. डीजे, साऊंड सिस्टिम वापरण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे. ध्वनी मर्यादा ओलांडल्यास कठोर कारवाई केली जाईल. मिरवणुकीत बीभत्स गाणी, धार्मिक भावना दुखावणारी गाणी न वाजवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. वृद्ध, गर्भवती महिला, लहान मुलांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

अन्यथा मंडळाच्या पदाधिकारी, डीजे चालक, मालक, ऑपरेटरवर गुन्हे दाखल करून साऊंड सिस्टिम जप्त केली जाईल, असा इशारा देण्यात आला. या बैठकीत उपस्थित असलेल्या डीजे चालकांनी नियम पाळण्याचे आश्वासन दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT