सांगली; पुढारी वृत्तसेवा : नागपूर शहरचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांची सांगली जिल्हा पोलीस प्रमुखपदी बदली झाली आहे. गृहविभागाने गुरुवारी (दि. २०) सायंकाळी बदलीचा आदेश जारी केला. तेली हे येत्या चार दिवसात पदभार स्विकारणार आहेत. (Sangli New SP)
सध्याचे जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. मात्र त्यांच्या बदलीचे कोणतेही आदेश आलेले नाहीत. राज्यातील ठाकरे सरकार पायउतार झाल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया थांबली होती. जिल्हास्तरावर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे 'गॅझेट' फुटले नव्हते. अखेर नव्या शिंदे सरकारने गुरुवारी बदल्यांची प्रक्रिया पार पाडली. (Sangli New SP)
गृहविभागाने गुरुवारी राज्यातील २४ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. यामध्ये नागपूर शहरचे पोलिस उपायुक्त बसवराज तेली यांची सांगली जिल्हा पोलिसप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. तेली येत्या चार दिवसात पदभार घेणार आहेत. त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खात्यांतर्गत बदल्या होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा