इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा : येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून (दि.१६) धरणे आंदोलनाला बसलेल्या चांदोली धरणग्रस्तांचे तिसऱ्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरुच आहे. भर उन्हात धरणग्रस्त आंदोलनाला बसले आहेत. मंगळवारच्या घटनेमुळे आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, धरणग्रस्तांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरु आहे.
शासनाने धरणग्रस्तांना जमिनीच्या लाखो रुपयांच्या थकीत कब्जेहक्काची रक्कम व १२ टक्के व्याज भरण्याच्या नोटीसा काढल्या आहेत. या नोटीसा मागे घ्याव्यात, या मागणीसाठी सोमवारी धरणग्रस्तांनी गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत येथेच ठिय्या मारण्याचा निर्णय धरणग्रस्तांनी घेतला. मंगळवारी दिवसभर धरणग्रस्त रस्त्यावरच ठिय्या मारुन बसले होते. त्यानंतर संतप्त धरणग्रस्त गेट तोडून तहसील कार्यालयात घुसले. बुधवारी तिसऱ्या दिवशीही हे ठिय्या आंदोलन सुरु आहे. दरम्यान, येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचलंत का ?