सांगली

सांगली : घर जागेच्या वादातून एकावर चाकू हल्ला, चौघांवर गुन्हा दाखल

backup backup

जत, पुढारी वृत्तसेवा : शहरातील आंबेडकर नगर येथे दीपक वसंत कांबळे (वय ४८) यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आल्याची घटना बुधवारी (दि.८) रात्री घडली आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी दीपक कांबळे वर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची फिर्याद दीपक कांबळे यांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आनंद तायाप्पा कांबळे, प्रभाकर काशीराम कांबळे, संभाजी काशीराम कांबळे व आनंद काशीराम कांबळे या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील आंबेडकर नगर येथील रहिवाशी असलेले दीपक कांबळे व त्यांचे चुलत भाऊ आंनद काशीराम कांबळे यांच्यात घराच्या जागेवरून मागील दहा वर्षापासून वाद आहे. बुधवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास दीपक कांबळे हे घरात झोपले असता आनंद कांबळे यांनी दीपक यांना उठवून आंबेडकर नगर येथील सभागृहात नेले. तेथे आनंद कांबळे यांच्याबरोबरच त्यांचे भाऊ प्रभाकर काशीराम कांबळे संभाजी काशीराम कांबळे व आनंद तायाप्पा कांबळे हे होते. तू माझ्या जागेत घर बांधले आहेस म्हणून चौघांनी शिवीगाळ करत मारहाण केली. मारहाण सुरू असताना आनंद तायाप्पा कांबळे याने दीपक कांबळे यांच्यावर चाकूहल्ला केला. याबाबतचा अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT