सांगली

Sangali Crime News : सावळज येथे धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून

मोहन कारंडे

तासगाव; पुढारी वृतसेवा : सावळज (ता. तासगाव) येथे धारदार शस्त्राने वार करून तरूणाचा खून केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. संतोष संजय पाटील (वय २५) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

याप्रकरणी पोलिसांनी बुधावारी रात्रीच चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. संतोष याच्या डोक्यात आणि पाठीत कोयत्यासारख्या हत्याराने वार करून त्याचा खून केला. संतोषच्या नातेवाईकांनी चौघांवर संशय व्यक्त केला आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT