
शिराळा; पुढारी वृत्तसेवा : इस्लामपूर येथील तरुणाचा शिराळा येथील बिरोबा डोहात बुडन मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. दुपारी चारच्या सुमारास घडलेल्या या घटनेतील तरुणाचे किरण दिपक शिनगारे (वय २५) असे आहे. त्याचा भाऊ अक्षय दिपक शिनगारे (वय २९ रा. दत्त टेकडी जवळ, इस्लामपूर) याने शिराळा पोलिसांत या घटनेची माहिती दिली.
पोलीस ठाण्यातून याबाबत मिळालेली माहिती अशी की, किरण शिणगारे हा त्याच्या मित्रांसोबत हुसेन कलावंत , संतोष ताटे , अवधूत खैरे , नितीन सूर्यवंशी , सोमनाथ सूर्यवंशी , संदीप सूर्यवंशी , हुसेन मोमीन या सात जणांसोबत बिरोबा डोह येथे फिरायला गेलेला होता. यावेळी त्याने पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली असता तो पाण्यात बुडाला. मित्रांनी त्याला पाण्यातून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय नेले असता मृत घोषित करण्यात आले .पुढील प्राथमिक तपास भानुदास कुंभार करत असून किरण याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे.