जत, पुढारी वृत्तसेवा : जत -चडचण राज्य मार्गावरील उटगी ते सोन्याळ रस्त्यावरील गणपती मंदिरानजीक दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहने जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सोन्याळ व निगडी बुद्रुक येथील दोघेजण जखमी झाले.
याबाबत अधिक माहिती अशी, उटगी गणपती मंदिराजवळ दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाली. दोन्ही दुचाकींनी पेट घेतला .काही क्षणातच दोन्ही दुचाकी जळून खाक झाल्या. घटनास्थळी उटगी , सोन्याळ परिसरातील लोकांनी गर्दी केली होती.
हेही वाचा :