सांगली

सांगली : पलूसच्या १४ ग्रामपंचायतींसाठी ८१.४ टक्के मतदान; मतमोजणीची उत्सुकता शिगेला

backup backup

पलूस, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि.१८) मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासून सुरु झालेल्या मतदान प्रक्रियेत एकूण ८१.३ टक्के मतदान झाले. थेट सरपंच पदासाठी निवडणूक झाल्यामुळे मतदारांसह उमदेवारांमध्येही उत्सुकता होती. मतदानाचा वाढता टक्का सत्ताधाऱ्यांना होईल की विरोधकांना हे मतमोजणीनंतरच समजणार आहे. उमेदवार व पॅनेल प्रमुख यांना मतमोजणीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. एकूण ५२ हजार ८४३ मतदारांपैकी ४२९६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात २२२११ पुरुष तर २०७५३ महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींसाठी ९१ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली. एकूण १५ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली असून यापैकी एक ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्याने १४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. आज सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची रांग लागल्याचे दिसून आले.

या गावात झाले इतके टक्के मतदान

बुर्ली ७८.४८ ,खटाव ९१.८८ ,सावंतपूर ७८.६७ ,ब्रम्हनाळ ८२.६४, सांडगेवाडी ८७.०६, सुखवाडी ८७.५२, बांबवडे ८२.०६, पुणदीवाडी ८५.०८, चोपडेवाडी ८५.१९, वसगडे ८०.५२ ,दूधोडी ८३.१६ पुणदी ८३.०१, घोगाव ८६.१६ अंकलखोप ७५.७ टक्के

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT