Sadasivrao Patil on Vita Municipal Election
विटा : विटा नगरपालिकेची आगामी निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढविली जाणार आहे. त्यामुळे माझ्या बदनामीचा कुटील डाव मांडला जात आहे, असा आरोप श्री नाथाष्टमी यात्रा कमिटीचे अध्यक्ष आणि माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी आज (दि.१०) पत्रकार परिषदेत केला.
भैरवनाथ यात्रा कमिटीच्या नावावर असलेल्या जागेवरून सामाजिक कार्यकर्ते रण जीत पाटील आणि माजी नगरसेवक अमर शितोळे यांनी सहकाऱ्यांसह बेमुदत धरणे आंदो लन केले होते. त्यावेळी त्यांनी काही प्रश्नही उप स्थित केले होते. त्यावर आज सदाशिवराव पाटील यांनी उत्तर दिले आहे. यावेळी सचिव आप्पा पाटील, शरद पाटील, किरण तारळेकर, सचिन शितोळे, विश्वनाथ कांबळे, सुभाष भिंगारदेवे, रवींद्र कदम, एक नाथ गडदरे, पांडुरंग पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
माजी आमदार पाटील म्हणाले, येथील श्रीनाथबाबा हा आमचा श्रद्धेचा आणि अष्टमीची यात्रा हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. गेल्या काही दिवसां पासून काही विषयांवर मला, यात्रा कमिटीला बदनाम करायचा डाव विरोधकांनी चालवला आहे. इथे काही इलेमेंट्स आहेत, जे कायदे पंडित, कायदेतज्ञ आणि सराईत तक्रारदार आहेत. कायदे पंडित त्यांना मटेरियल देतात आणि सराईत लोक तक्रार करतात. तोच इथे झाला आहे. वास्तविक आपली भूमिका मी अष्टमीच्या यात्रेपूर्वीच मंदिरात सगळ्यांसमोर मांडली होती. पण नगरपालिकेच्या निवड णुकीच्यादृष्टीने माझे चारित्र्यहनन करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा विरोधकांचा हा प्रयत्न आहे.
भैरवनाथ यात्रा कमिटी हे प्रचलित नाव आहे. मात्र, नाथाष्टमी उत्सव कमिटी हे रजिस्टर्ड नाव आहे. असे सांगत भैरवनाथ मंगल कार्यालयाची जागा, हणमंतराव पाटील यांच्या समाधीची जागा, हनुमान मंदिराची जागा तसेच भैरवनाथ तालमीची जागा या जागा मूळ कोणाच्या होत्या ? त्या यात्रा कमिटीच्या नावावर कशा झाल्या आणि त्यानंतर गेल्या काही वर्षांत त्याचा वापर कसा झाला ? याबाबत सवि स्तर माहिती दिली आहे.
ते म्हणाले, विटा मध्ये गाव भागातल्या गणपतीच्या मंदिराला लागून दोन देवस्थान. एक सिताराम आणि त्र्यंबकेश्वर देव स्थान. त्यांच्या जागा मागणी रस्त्याला सध्या जिथे भैरवनाथ मंगल कार्यालय आहे तिथे होत्या. त्याचे बिसूरकर हे कुळ होते तर पिलाजी कुलकर्णी हे वहिवाटदार होते. ते आता हयात नाहीत. त्यावेळी वहिवाटदार आणि कुळ यांच्यात तोडजोडीने मार्ग काढण्यासाठी बिसूर कर हणमंतराव पाटील यांच्याकडे आले. त्या नुसार पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांच्या आदेशा नुसार तडजोडीने मार्ग काढला. यात बिसूरकरांना जागा आणि कुलकर्णी यांना पैसे मिळाले. त्यावेळी गावात मंगल कार्यालय, बहुजनांसाठी सार्वजनिक सभागृह असावे, असे वाटत होते. म्हणून सन १९८२ मध्ये त्यांनी बिसूरकरांकडून जागा खरेदी केली.
ती खरेदी करताना त्या वेळच्या कायद्यानुसार कुळाची जमीन एखाद्या शेतक ऱ्याला, संस्थेला किंवा ट्रस्टला विकायची असेल. तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आव श्यक होती. मात्र, त्यावेळी या गोष्टी माहीत नसल्याने यात्रा कमिटीच्या नावावर खरेदी पत्र झाले. मंगल कार्यालयाची इमारत उभा करण्याचे काम सुरू केले आणि तेव्हा पासून अशा तक्रारी सुरू आहेत.
त्यानंतर भैरवनाथ तालमी च्या जागेच बाबतीचा विषयही न्याय प्रविष्ट आहे, त्याचा जो निर्णय होईल तो मलाही मान्य आहे. गेली ४० वर्षे विट्याच्या जनतेने आम्हाला स्वीकारले आहे. नाथ बाबाचा एक रुपयाही आम्ही खाल्ला नाही. गेल्या साडेतीन वर्षांत खालपासून वरपर्यंत तुमची सत्ता होती. त्यावेळी तुम्ही काहीच का केले नाही ? गावात अशांतता पसरविण्याचे काम केले जात आहे, जे काही चालले आहे. ते केवळ राजकारणासाठीच, असा पाटील यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.