सांगली

इस्‍लामपुरात रखडलेल्‍या रस्‍ते कामांच्या निषेधार्थ राष्‍ट्रवादीचा रास्‍ता रोको

निलेश पोतदार

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा येथील इस्लामपूर – कामेरी रस्त्याच्या रुंदीकरणाचे रखडलेलं काम तातडीने सुरु करावे, तसेच गँस पाईपलाईनसाठी रस्ता खुदाई केल्याने दुरावस्था झालेल्या पेठ – सांगली रस्त्याची सुरुस्ती करावी. या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज (शुक्रवार) रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. येत्या आठ दिवसात रस्त्याचे काम सुरु करु असे आाश्वासन सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, भगवान पाटील, माजी नगरसेव खंडेराव जाधव, माजी उपनगराध्यक्ष दादासो पाटील, संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पेठ – सांगली रस्त्यावर ठिय्या मारुन रस्ता रोकण्यात आला. यावेळी प्रशासनाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी शहाजी पाटील म्हणाले, दिड वर्षापूर्वी माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी इस्लामपूर – कामेरी रस्त्याच्या रंदीकरणासाठी व काँक्रिटीकरणासाठी २५ कोटींचा निधी मंजूर केला होता. या कामाचे भूमीपूजनही झाले होते. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यापासून या कामाची अद्याप सुरुवात झालेली नाही. हे काम का रखडलेय, मंजूर निधीची कुठे विल्हेवाट लागली. याची माहिती जनतेला मिळायला हवी. गँस पाईपलाईनसाठी खुदाई करण्यात आल्यामुळे पेठ- सांगली रस्त्याची अत्यंत दुरा‍वस्था झाली आहे. त्यामुळे अपघात वाढले आहेत. या रस्‍त्‍यांमुळे अनेकांचे बळी गेले आहेत. याकडे सार्वजनिक बांधक‍ाम विभागाचे दुर्लक्ष आहे.

म‍ाजी नगराध्यक्ष सुभाष सुर्यवंशी, बाबुराव हुबाले, युवक राष्ट्रवादीचे सचीन कोळी, स्वरुप मोरे, सोन्या देसाई, रोझा किणीकर, प्रियांका साळुंखे, संगीता सपकाळ, पुष्पलता खरात, सुनीता कांबळे, भुषण शहा, सुहास हांडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT