अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विवाह File Photo
सांगली

Underage Marriage Case | अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विवाह

जत तालुक्यातील घटना : पतीसह नऊजणांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

जत : जत तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून जबरदस्तीने विवाह केल्याप्रकरणी पती, आई, आजी, आजोबा, मामा, सासू, सासरा, नणंद, अनोळखी भटजी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पीडित अल्पवयीन मुलीचा पती नितीन श्रीमंत मोटे, आई पूनम रावसाहेब जानकर, आजोबा राजाराम शेजूळ, आजी राणी शेजूळ, मामा महेश राजाराम शेजूळ, सासू इंदाबाई श्रीमंत मोटे, सासरा श्रीमंत मोटे, नणंद रेखा पोपट इरकर, अनोळखी भटजी यांचा समावेश आहे.

पीडित विवाहिता अल्पवयीन असल्याचे माहीत असतानादेखील तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने पती नितीन मोटे याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम 137 (2), 64(2) सह बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद अल्पवयीन पीडित मुलीने जत पोलिसात दिली आहे. ही घटना दि. 16 जूनपासून 5 नोव्हेंबरपर्यंत घडली आहे. कवठेमहांकाळ येथील एका मंदिरात जबरदस्तीने विवाह करण्यात आला होता.

याबाबत अधिक माहिती अशी, संशयित पती नितीन श्रीमंत मोटे याने दि. 16 जूनरोजी यातील पीडित अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला आपल्या घरात नेऊन ठेवले. त्यानंतर संबंधित पीडित अल्पवयीन मुलीची आई, आजी, आजोबा, मामा, सासू, सासरा, नणंद व अनोळखी एका भटजीने कवठेमहांकाळ येथील एका मंदिरात नितीन मोटे याच्याशी 3 जुलैरोजी पीडितेचा विवाह करून दिला. या संशयित नऊ जणांना देखील मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती होती. तरीदेखील लग्न लावून देण्यात आले. लग्नानंतर पती नितीन मोटे याने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही 3 जुलैपासून 5 नोव्हेंबरदरम्यान तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले.

समाजसेवी संस्थेच्या पुढाकाराने घटनेचा छडा

याबाबतची माहिती सांगली येथील एका संस्थेला मिळाली. संबंधित संस्थेने पीडित मुलीची भेट घेतली. संबंधित मुलीला याबाबतची माहिती देऊन सांगली येथील बालनिरीक्षण गृहात महिला पोलिस नाईक नीशा सावंत, शुभांगी धुमाळे यांच्या समुपदेशातून पतीसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक बिरप्पा लातुरे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT