Sangli marijuana seizure
गांजा file photo
सांगली

सांगलीत अडीच लाखांचा गांजा जप्त

संजयनगर येथे स्थानिक गुन्हे पथकाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

सांगली : संजयनगरमधील गांधी कॉलनी येथे मोपेडवरून गांजा घेऊन चाललेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून अडीच लाखांचा गांजा, एक लाखाची मोपेड असा 3 लाख 50 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

इनाममुलहसन बाबासाहेब शेख (वय 28) व अरमान मिरासाब शेख (20, रा. राजीव गांधी कॉलनी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या दोघांना गांजा पुरवणारा अरबाज ऊर्फ इप्तेखार बाबासाहेब शेख हा पसार झाला. पोलिसांच्या पथकाला दि. 5 रोजी जुना कुपवाड रस्त्यावरील दुधाळ कॉर्नरजवळून मोपेडवरून गांजा विक्रीसाठी काहीजण येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने गांधी कॉलनी परिसरात सापळा रचला. पथकाला मोपेडवरून दोघेजण येताना दिसले. पथकाने संशयावरून त्यांना थांबवले. त्यांच्या मोपेडवर असलेल्या पिशवीची तपासणी केली असता गांजा मिळून आला. गांजा कोठून आणला याची चौकशी केली असता, इनाममुलहसन याने त्याचा भाऊ अरबाज याच्याकडून गांजा आणला असून, तो विक्रीसाठी घेऊन चालल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.