सांगली

जत : ऊसतोड मुकादमाचे अपहरण, गिरगाव येथील घटना; चौघांवर गुन्हा दाखल

backup backup

जत, पुढारी वृत्तसेवा

गतवर्षी कारखान्याचे कराराप्रमाणे काम पूर्ण केले नाही तसेच अर्धवट काम केल्याच्या कारणावरून एका ऊसतोड मुकादमाचे जबरदस्तीने बोलेरो गाडीतून अपहरण केल्याची घटना घडली. अपहरण केलेल्या मुकादमाचे नाव हाजाप्पा शरणाप्पा मादार (वय३५) असे आहे. याप्रकरणी श्रीकांत पुजारी (वय. ४३ रा. गिरगाव) व जी.आय. पाटील (रा. निराणी ता. मुधोळ जि. बागलकोट, कर्नाटक) व इतर दोघांवर उमदी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद शरणाप्पा मादार यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जत गिरगाव येथील हाजाप्पा मादार यांनी कर्नाटकातील एका ट्रॅक्टर मालकाशी ऊसतोडी मजूर देण्याचा करार केला होता. गतवर्षी कराराप्रमाणे हाजाप्पा यांना काम करता आले नाही. हाजाप्पा मादार यांचे नातेवाईक चंद्रकांत यांनी अर्धवट काम सोडून दिले होते. मागच्या वर्षी कारखान्याचे ठरल्याप्रमाणे काम पूर्ण केले नाही याच कारणावरून मादार हे गिरगाव येथे अशोक चव्हाण यांच्या शेतात ऊसतोडीचे काम करत असताना एका लाल रंगाच्या बोलेरो गाडीतून आरोपींनी बोलेरो गाडीत घालून मादार यांचे अपहरण केले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT