Hailstorm Sangli News pudhari
सांगली

Hailstorm Sangli News: द्राक्षाचं मणीच नुसतं फुटलं नाय तर आमचं नशीबबी फुटलं! गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा

Anirudha Sankpal

विटा : विजय लाळे

"साहेब, ह्या अवकाळीच्या गारपीटीनं द्राक्षाचं मणीच नुसतं फुटलं नाय तर आमचं नशीबबी फुटलंय. आता नुसती तोंडदेखली मदत नको तर नुस्कान भरपाई द्या, घातलेलं पैसं तरी मिळवून द्या !" करंजे गावचे विठ्ठल दशरथ कापसे अक्षरशः थरथरत बोलत होते. (Hailstorm Sangli News)

हाता-तोंडाशी आलेली द्राक्षबाग गेली

खानापूर घाटमाथ्यावरील करंजे, हिवरे, पळशी, बाणूरगड, ताडाचीवाडी, सुलतानगादे, कुसबा वडे आदी गावांत काल गुरुवारी अवकाळी पाऊस पडला. मात्र पडताना या पावसाने सोबत आणलेल्या मोठमोठ्या गारांमुळे हाता-तोंडाशी आलेले द्राक्ष पीक तसेच इतर पिके पूर्णतः जमीनदोस्त झालीत. निर्यातक्षम द्राक्ष बागांचेही प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यांत करंजे गावाच्या शिवारातले दीड एकरातली विठ्ठल दशरथ कापसे यांची भरात आलेली द्राक्ष बाग गारपिटीच्या तडाख्यात सापडली. दीड एकरात पाणी पाणी झाले आहे. जवळपास प्रत्येक घडावर गार पडल्याचे दिसत आहे.

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

फुटलेल्या द्राक्षाच्या मण्यातून आणि विठ्ठल कापसे यांच्या डोळ्या तून एकाच वेळी पाणी वाहत होते. या भागाला आज शुक्रवारी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, विटा शहर उपाध्यक्ष गजानन सुतार, सतीश शिंदे, सचिन गोतपागर यांनी भेट दिली. तिथे बागेच्या पंच नाम्याचे काम सुरू होते. मंडल अधिकारी महा देव पाटील यांच्या समोर बोलताना विठ्ठल कापसे आपला हुंदका आवरत ते म्हणाले, "परवाच एकजण व्यापारी बाग बघून गेला होता. १०३ रुपये किलो पर्यंत दर ठरला. पन्नास एक लाख हातात पडतील असं वाटत होतं. मागचा हंगाम पण अवकाळीनच गेला. आणि आता हा अवकाळी पाऊस अवदसा जणू अवदसा बनून आला. गारा आल्या आल्या म्हणे स्तोवर झिम्माड सडा सुरू झाला. बागा झाका यला सुद्धा वेळ दिला नाय". मंडल अधिकारी महादेव पाटील शांतपणे पाहत होते. संपूर्ण घाटमाथ्यावर अशीच परिस्थिती आहे.

मोठं आर्थिक संकट

या गारपिटीमुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत, त्यांच्यावर कर्जाचा मोठा भार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त क्षेत्राला शासनाकडून योग्य ती भरघोस आर्थिक मदत व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी चंद्रकांत चव्हाण यांनी केली आहे.

पंचनाम्याचं काम सुरू

दरम्यान, आतापर्यंत ७० टक्के अनुदान अधिक पंचनामे पूर्ण झालेले आहेत. प्राथमिक अंदाजा नुसार या गारपिटीचा तडाखा तब्बल ३५० हून अधिक शेतकऱ्यांना बसला आहे. तर ५०० एकरांतील पिकांना बसलेला आहे. यांत फळबागा ३०० एकर , इतर फळबागा ७५ एकर आणि १२० एकर जिरायत पिके गारपीटग्रस्त झालेली आहेत अशी माहिती महसूल विभागाकडून मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT