घनसावंगी तालुक्याला पावसासह गारांचा तडाखा

गहू हरभरा ज्वारीसह रब्बी पिके, भाजीपाला व फळबागांचे मोठे नुकसान
Ghansawangi taluka
घनसावंगी तालुक्याला पावसासह गारांचा तडाखाfile photo
Published on
Updated on

Ghansawangi taluka receives hailstorm along with rain

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : घनसावंगी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने चांगलाच तडाखा दिला. गारांचा प्रचंड वर्षाव झाल्याने रांजणी, वाणेगाव, कुंभार पिंपळगाव, चिंचोली, शिंदखेड, बोडखा, मांदळा, ढाकेफळ आदी गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसगनि पुन्हा हिरावून घेतल्याची भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

Ghansawangi taluka
Unseasonal Rain nanded | हिमायतनगर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा; रब्बी पिके व फळबागांचे मोठे नुकसान

सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाला सुरुवात झाली. काही भागांत गारांचा अक्षरशः सडा पडल्याचे चित्र पाहायला मिळाले, वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला.

तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा यांसह ज्वारी आणि विविध भाजीपाला पिकांची काढणी अंतिम टप्प्यात होती. अनेक शेतकऱ्यांनी काढलेली पिके शेतातच होती, तर काही ठिकाणी काढणी सुरू होती. अचानक झालेल्या पावसामुळे ही पिके पूर्णपणे भिजली असून गव्हाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.. हरभऱ्याच्या घाटे भिजल्याने उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Ghansawangi taluka
Unseasonal Rains : वडवणी, आष्टी, केजला अवकाळीचा तडाखा

याशिवाय गारपिटीमुळे आंबा व इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून झाडांवरील फळे गळून पडली आहेत. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.

वीज पडून दोन ठिकाणी पशुधन दगावले

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाच्या अहवालानुसार १ म्हैस आणि १ बैल दगावली घटना घडली आहे. नसडगाव येथील शेतकरी परमेश्वर अशोक भुतेकर यांचा बैल वीज पडून मरण पावला आहे. बोरगाव खुर्द येथील शेतकरी संतोष धोंडीभाऊ भानुसे यांची म्हैस बीज पडून मयत झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news