सांगली

सांगली : खरसुंडी येथील जनावरांची यात्रा लंपीमुळे रद्द

backup backup

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : खरसुंडी येथील श्री सिध्दनाथ देवाची ६ ते १२ जानेवारी दरम्यान होणारी जनावरांची यात्रा लंपी चर्मरोगाचा उद्रेक होऊ नये म्हणून रद्द करण्यात आली आहे. तहसीलदार तथा लम्पी चर्मरोग संनियंत्रण तालुकास्तरीय समिती अध्यक्ष बाई माने यांनी दिली.

आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथे पौष महिन्यात खिलार जनावरांची मोठी यात्रा भरते. कोरोनामुळे दोन वर्षे यात्रा न झाल्याने यंदा मोठी यात्रा भरेल अशी अपेक्षा होती.परंतु ही यात्रा आता रद्द करण्यात आली आहे

तालुक्यात गाय व म्हैस वर्गीय पशुधनावार लंपी चर्मरोगाचा फैलाव झाला आहे.लंपी रोगाचा प्रादुर्भाव सुरू असून सदर रोगावर नियंत्रण आलेले नाही.त्यामुळे खबरदारीचा उपाय रोगाचा उद्रेक होऊ म्हणून ही यात्रा रद्द करण्यात आली आहे

खरसुंडी यात्रेसाठी येणा-या जनावरांचे तालुका हददीच्या बाहेर रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत.

हेही वा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT