सांगली

इस्‍लामपुरात मराठा समाजाचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

निलेश पोतदार

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला वाळव‍ा तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावोगावी लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहेत. तर अनेक गावांनी लोकप्रतिनिधींना गावबंदी केली आहे. आरक्षणासाठी मराठा समाज संघटीत होवू लागला आहे.

आरक्षणासाठी जरांगे – पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्यावतीने गावोगावी उपोषण करण्यात येत आहे. इस्लामपूर येथील तहसील कार्यालयासमोर कार्यकर्ते उपोषणास बसले आहेत. तसेच आष्टा, येडेनिपाणी या ठिकाणीही शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु आहे. काही गावांनी राज्यकर्त्यांना गावबंदी केली आहे. ठिकठिकाणी कँडल मार्च काढण्यात येत आहेत. एकूणच तालुक्यात मराठा आरक्षण आंदोलनाची धार वाढत चालली आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT