सांगली : पुणे पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ सोमवारी शरद लाड यांच्या निवासस्थानासमोर आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार सुरेश खाडे, आ. सत्यजित देशमुख, आ. अरुण लाड, आ. धैर्यशील कदम, प्रदेश सचिव शरद लाड, पदवीधर मतदार संघातील उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव, शिक्षक मतदार संघातील उमेदवार कौस्तुभ गावडे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजप नेत्या जयश्री पाटील, संग्राम देशमुख आदी उपस्थित होते. pudhari photo
सांगली

Devendra Fadnavis : शरद लाड यांना योग्य स्थान, कामाचा अधिकार देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; डॉ. स्मिता योगेश जाधव, कौस्तुभ गावडे चांगल्या मताधिक्याने विजयी होण्याचा विश्वास

पुढारी वृत्तसेवा

सांगली : स्वातंत्र्यसैनिक जी. डी. (बापू) लाड, आमदार अरुण लाड आणि आता शरद लाड यांनी जनसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. लाड कुटुंबाचा मोठा वारसा असून, तो शरद लाड यांना समाजात आणि जनमानसात पुढे नेता यावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. निवडणुकीनंतर त्यांची पूर्ण काळजी घेण्याबरोबरच त्यांना योग्य स्थान आणि काम करण्याचे अधिकार मिळतील, याची काळजी घेऊ, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

सांगलीत सोमवारी भाजप महायुतीचे पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभगावडे यांच्या प्रचारार्थ शरद लाड यांच्या निवासस्थानासमोर आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार सुरेश खाडे, आ. सत्यजित देशमुख, आमदार अरुण लाड, आ. धैर्यशील कदम, उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव, कौस्तुभ गावडे, भाजपचे प्रदेश सचिव शरद लाड, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजप नेत्या जयश्री पाटील, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, प्रकाश ढंग, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख, भाजप नेते मकरंद देशपांडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, लाड कुटुंबीयांच्या संघर्षामुळे समाजात या कुटुंबाला मोठा सन्मान आहे. शरद लाड यांनी आमच्या आग्रहाखातर भाजपसोबत येण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीसाठी शरद लाड यांचे नावही प्रामुख्याने विचाराधीन होते. मात्र सगळी चर्चा झाली. त्यानंतर उमेदवार निश्चित करण्याचे काम पक्षाने करावे आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आपण दिवस-रात्र मेहनत करू, अशी ग्वाही लाड यांनी दिली, त्यानंतर पक्षाने निर्णय घेतला.

शरद लाड यांना कार्यकर्त्यांची साथ

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शरद लाड यांनी घेतलेल्या मेहनतीला कार्यकर्त्यांची साथ मिळत आहे. त्यामुळे डॉ. स्मिता योगेश जाधव आणि कौस्तुभ गावडे हे दोन्ही उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी होतील. उमेदवार विजयी झाल्यानंतर पुन्हा भेटीसाठी येऊ. या मेळाव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT