पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आज (दि.२३) अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. ते तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात घड्याळ चिन्हावर लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे सुपुत्र युवा नेते रोहित पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण झाले आहे.
यापुर्वी त्यांना भाजपकडून लोकसभेला उमेदवारी देण्यात आली होती, मात्र त्यावेळी विशाल पाटील यांनी अपक्ष उभे राहून लोकसभेचे मैदान मारले. राष्ट्रवादी अजित पवार गटात त्यांनी प्रवेश केला असला तरी ते महायुतीचेच उमेदवार आहेत. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी संजय पाटील यांना पाठिंबा दिल्याने निश्चितच त्यांची ताकद वाढणार आहे. त्यामुळे युवा नेते रोहित पाटील व त्यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. ते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ते २९ ऑक्टोबरला ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.