सांगली

सांगली : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

दिनेश चोरगे

शिराळा, पुढारी वृत्तसेवा : चिखली (ता. शिराळा) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.९) सकाळी ११ ३० च्या दरम्यान घडली. उत्तम भीमराव कुरणे (वय ४२) असे या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, उत्तम कुरणे हे सकाळी आपल्या काकाच्या घरातून जेवण करून दुचाकीवरून चिखली येथे येत होते. दुचाकी क्रं. (एम एच १० बी एन ३२९२) वरून चिखली – नोटाली रस्त्यावर ते आले असता त्यांना अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली. अपघातानंतर वाहनचालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर काही नागरिकांनी त्यांना जखमी अवस्थेत शिराळा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारापुर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद शिराळा पोलिसांत झाली असून अज्ञात वाहनाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. उत्तम कुरणे हे आनंदराव नाईक पतसंस्थेचे सचिव तानाजी कुरणे यांचे पुतणे आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT