सांगली

सांगली : मीटर रिडिंग घेणार्‍या ४७ एजन्सी बडतर्फ ; आठ एजन्सी काळ्या यादीत

Shambhuraj Pachindre

सांगली पुढारी वृत्तसेवा : लघुदाब वर्गवारीतील वीज मीटर रिडिंगमध्ये हेतुपुरस्सर चुका केल्याचे आढळून आल्याने राज्यातील तब्बल 47 मीटर रिडिंग एजन्सीजना बडतर्फ केले आहे. यातील 8 एजन्सींना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. महावितरणने फेब्रुवारीपासून मुख्यालय व क्षेत्रीय कार्यालयांनी एकत्रितपणे मीटरच्या अचूक रिडिंगसाठी धडक उपाययोजनांना सुरुवात केली आहे.

महावितरणच्या सुमारे 2 कोटी 15 लाख लघुदाब ग्राहकांकडील मीटरचे रिडिंग कंत्राट पद्धतीच्या एजन्सीद्वारे करण्यात येते. या एजन्सीने काढलेल्या मीटर रिडिंगच्या फोटोची खातरजमा व पडताळणी करण्यासाठी मुख्यालयात यापूर्वीच स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाने केलेल्या पडताळणीमध्ये मीटर रिडिंगचे फोटो अस्पष्ट असणे, फोटो व प्रत्यक्ष रिडिंगमध्ये तफावत असणे तसेच रिडिंग न घेता आल्याचा हेतुपुरस्सर शेरा देणे, आदी प्रकार आढळून येत आहे. त्याप्रमाणे संबंधित एजन्सीच्या कामामध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही एजन्सींविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.

गेल्या चार महिन्यांमध्ये मीटर रिडिंगच्या कामामध्ये हयगय करणार्‍या तब्बल 47 मीटर रिडिंग एजन्सींना बडतर्फ करण्यात आले आहे. यामध्ये नांदेड परिमंडलातील 10, जळगावमधील 8, अकोल्यातील 7, लातूर, कल्याण, बारामती व नाशिकमधील प्रत्येकी 4, औरंगाबादमधील 2, तसेच पुणे, चंद्रपूर, कोकण व अमरावती परिमंडलातील प्रत्येकी एका एजन्सीचा समावेश आहे. यातील 8 एजन्सींना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. यामुळे एक महिन्यात वीजविक्रीमध्ये 199 दशलक्ष युनिटने म्हणजेच 140 कोटी रुपयांनी महावितरणच्या महसुलात वाढ झाली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT