रायगड

कशेडी घाटात ट्रकचा भीषण अपघात; सुदैवाने चालक बचावला

सोनाली जाधव

पोलादपूर; धनराज गोपाळ : मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मुंबई दिशेने जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक पलटी होऊन अपघात झाला. हा अपघात पोलादपूर नजीक चोळीई हद्दीत एका अवघड वळणावर झाला. ही घटना मंगळवार रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या अपघातात चालक बचावला आहे. मात्र  ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

 याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुनील सोपान वाघमारे (वय ५०) गोवा येथून गुरांचा चारा (भुसा) घेऊन कल्याण दिशेने जात होते. पोलादपूर नजीक कशेडी घाट उतरत असताना चोळई गावाजवळ आले. तेथील उतारावर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक रस्ता सोडून चौपदरीकरण काम सुरू असलेल्या मोकळ्या जागेत पलटी झाला. ट्रकच्या कॅबिनेचा भाग, ट्रकची डिझेल टाकी, चाके निखळून एका बाजूला झाली आहेत. या भीषण अपघातात ट्रकचालक सुनील वाघमारे बचावला आहे. चालकाचा डोक्याला किरकोळ दुखापत तर डावा हात फॅक्चर झाला आहे.

  या घटनेची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

SCROLL FOR NEXT