Rohit Sharma And Shikhar Dhawan : रोहित शर्मा शिखर धवनच्या जोडीने केली कमाल | पुढारी

Rohit Sharma And Shikhar Dhawan : रोहित शर्मा शिखर धवनच्या जोडीने केली कमाल

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंड आणि भारतादरम्यान सुरु असेलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लंडन येथील ओवल मैदानावर मंगळवारी (दि. १२ जुलै) खेळविण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार तसेच सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांची जोडी (Rohit Sharma And Shikhar Dhawan) अनेक दिवसांनी एकदिवसीय सामन्यात सलामीला खेळताना दिसली. अनेक काळाच्या नंतर सलामीला एकत्र येताना या दोघांनी चांगली फलंदाजी तर केलीच, शिवाय त्यांनी सलामीची जोडी म्हणून ५००० धावा पुर्ण करणाऱ्या क्लबमध्ये सामील होण्याचा बहुमान मिळवला. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात या दोघांनी ११४ धावांची भागिदारी रचत भारताला १० विकेट राखून विजय मिळवून दिला.

इंग्लंड विरुद्धच्या सामन्याच्या आधी रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीला (Rohit Sharma And Shikhar Dhawan) पाच हजार धावांच्या क्लबमध्ये सहभागी होण्यासाठी फक्त ६ धावांची आवश्यकता होती. या सामन्यात या दोघांनी या धावा सहजगतीने जोडल्या. या आधी या क्लबमध्ये भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडूलकर आणि माजी कर्णधार व सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्या जोडीचे नाव अग्रभागी आहे. त्यांच्या सलामी जोडीने १३६ सामन्यात भारताच्या डावाची सुरुवात करताना ६६०९ धावा जोडल्या आहेत. या जोडीनंतर ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यु हेडन आणि ॲडम गिलख्रिस्ट यांचे नाव येते या जोडीने सलामीला येत ५३७२ धावा जोडल्या आहेत. त्यांनतर वेस्ट इंडिजचे डेसमंड हेन्स आणि गॉर्डन ग्रीनिज यांनी ५१५० धावा बनवल्या आहेत. आत या तिन्ही सलामी जोडींच्या नंतर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या जोडीचा क्रमांक लागतो. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यानंतर या दोघांच्या जोडीच्या नावावर ५१०८ धावांची नोंद झाली.

रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने (Rohit Sharma And Shikhar Dhawan) भारतासाठी ११२ सामन्यांमध्ये सलामीला येत डावाची सुरुवात केली आहे. तसेच या दरम्यान या दोघांनी आतापर्यंत १८ वेळा शतकीय भागीदारी रचली आहे. या दोघांनी मिळून २१० धावांची सर्वात मोठी भागीदारी रचली आहे. शतकीय भागीदाऱ्यांचा आढावा घेतला तर सचिन तेंडूलकर आणि सौरव गांगुली यांनी २६ वेळा शतकी भागीतदारी रचली आहे. या यादीचे तेच पुढे आहेत. त्यांनर श्रीलंकेच्या कुमार संघकारा आणि तिलकरत्ने दिलशान या दोघांनी २० वेळा एकदिवसीय सामन्यात शतकी भागीदारी रचली आहे.

रोहित आणि शिखर धवन (Rohit Sharma And Shikhar Dhawan) यांनी १५ वेळा अर्धशतकीय भागीदारी देखिल रचली आहे. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात अनेक दिवसांच्या कालवधीनंतर शिखर धवन याला एकदिवसीय सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. या सामन्याद्वारे त्याने १५० एकदिवसीय सामने खेळण्याचा टप्पा देखिल पुर्ण केला. शिखर धवन याने १५० सामन्यामध्ये ४५.७६ च्या सरासरीने ६३१५ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने १७ शतके व ३५ अर्धशतके बनवले आहेत. आगामी वेस्टइंडिज दौऱ्यासाठी शिखर धवन याला एकदिवसीय सामन्यासाठी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यामध्ये सिनियर खेळाडुंना विश्रांती देण्यात आली आहे.

Back to top button