जेएनपीएः उरण ते नवी मुंबई लोकल सेवेच्या फेऱ्यांमध्ये सोमवारपासून वाढ करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय आता कमी होऊ लागली आहे. उरण ते नवी मुंबई लोकल मार्गावर दररोज सुमारे 14 हजार प्रवासी ये-जा करीत असून, उरणहून पहाटे लवकर आणि रात्री उशिराची लोकलसेवा सुरू करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. सोमवारपासून उरण ते नवी मुंबई दरम्यान लोकलच्या 10 फेऱ्या वाढविल्या आहेत.
उरण आणि बेलापूर येथून पहाटे 5.30 वाजता पहिली लोकल, रात्री 10.30 वाजता शेवटची रेल्वे सुरू करण्यात आली आहे. नवीन स्थानकांसह 10 लोकल फेऱ्या वाढल्यामुळे नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांना रेल्वेकडून दोन मोठे गिफ्ट्स मिळाले आहेत. यामुळे प्रवाशांची खूप सोय होणार आहे. नवीन सुरू केलेले तरघर स्थानक नवी मुंबई विमानतळाच्या अगदी जवळ असल्यामुळे विमानतळाच्या प्रवाशांनही या स्थानकाचा फायदा होणार आहे. दुसर स्थानकसुद्धा काल कार्यन्वित झाले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील अनेक ठिकाणांची रेल्वेशी कनेक्टीव्हीटी वाढली आहे. दरम्यान,या रेल्वे सेवेने उरणचे दळवणवळण वाढले आहे|शिवाय नोकरदार,विद्यार्थ्यांची सोयही झाली आहे.