

ठाणे : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून डाऊन रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लोकल सेवा गेल्या ५ ते ६ दिवसांपासून निश्चित ढिसाळ वेळेपेक्षा उशिराने धावत असल्यामुळे तब्ब्ल ५ दिवसांपासून मध्य रेल्वेच्या प्रवाशी चाकरमान्यांना लेट मार्कला सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान नियमित प्रवास करणाऱ्या बहुतांश प्रवाशांचे लेट लोकल सेवांमुळे हाल झाल्याचे दिसून येत आहेत. प्रवाश्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या ५ ते ६ दिवसांपासून मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा तब्बल अर्धा-पाऊण तास उशिराने धावत होत्या. उशिराने रवाना झाल्यामुळे चाकरमान्यांना, कार्यरत प्रवाश्यांना आणि नोकरदार वर्गाला गंतव्यस्थानी पोहोचण्यास उशीर झाला; परंतु या चिंताजनक बाबीची चौकशी प्रवाश्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली असता रेल्वे प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर आले नसल्याचे प्रवाश्यांनी सांगितले.
रविवार २६ ऑक्टोबर रोजी, मध्य रेल्वे मार्गावरील माहीम ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळांच्या दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक ठेवण्यात आला होता. परंतु रेल्वे मार्गावरील काही रेल्वे रुळांची देखभाल योग्यरीत्या झालेली नाही आणि त्यामुळे त्या रेल्वे लाईनवरून लोकल कमी वेगाने रवाना केली जात आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या ५ ते ६ दिवसांपासून लोकल रेल्वे सेवा मध्य रेल्वे मार्गावरील निश्चित रेल्वे स्थानकांवर उशिराने पोहोचत
आहेत. प्रवाश्यांच्या म्हणण्यानुसार बुधवार, रोजी सकाळी ५.३७वाजताची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कर्जत जाणारी लोकल तब्ब्ल ४५ मिनिटे उशिराने मुलुंड रेल्वे स्थानकावर पोहोचली त्याचप्रमाणे शुक्रवार रोजी, दुपारी २. १८ वाजताची परळ ते डोंबिवली लोकल तब्बल २५ मिनिटे उशिराने धावली व गुरुवार रोजी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण रेल्वे स्थानकासाठी प्रवास करणारी लोकल १५ मिनिटे कुर्ला रेल्वे स्थानकावरच थांबवण्यात आली.
लोकलचा विलंब तत्काळ थांबवावा...
इतर लोकल सेवा अलीकडच्या दिवसांमध्ये उशिराने प्रवास करत असतात; परंतु रेल्वे प्रशासनाकडून लेट लोकल सेवांवर कोणतीही प्रतिक्रिया करण्यात आलेली नाही. मुंबईची लाईफलाईन अशी उपमा लोकल सेवेला असली तरी या लोकल सेवांना चालवणारे कुठेतरी कामात अपुरे पडत आहेत, असे प्रवाश्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे कोणती आणि कुठल्या रेल्वे लाईनमुळे लोकल सेवा उशिराने चालतात त्याचा योग्य तपास करावा आणि लोकलचा होणारा विलंब तत्काळ थांबवावा, अशी प्रवाश्यांची मागणी आहे. लोकलच्या प्रवासात विलंब झाल्याने इतर चाकरमानी, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाच्या कामावर याचा परिणाम होत आहे.