अवकाळीने ‘हापूस नगरी’ला दिला जबर धक्का pudhari photo
रायगड

Raigad News : अवकाळीने ‘हापूस नगरी’ला दिला जबर धक्का

श्रीवर्धन तालुक्यात आंबा, भातासह नाचणी पिकांवर संकट; नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या तज्ज्ञांच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

श्रीवर्धन : भारत चोगले

कोकणातील नैसर्गिक शेती व्यवस्थेवर अवलंबून असलेला श्रीवर्धन तालुका गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि सतत ढगाळ वातावरणामुळे मोठ्या संकटात सापडला आहे. भात व नाचणी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर आता आंबा उत्पादकांवरही भीषण संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हापूस, पायरी आणि केसर या सर्वच जातींमध्ये ‌‘मोहोर लांबणीवर‌’ पडण्याचे संकेत स्पष्ट दिसत असून आगामी हंगामात उत्पादन घसरण्याची खरी भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे. श्रीवर्धन तालुक्यात 1910 हेक्टरांवर आंब्याची लागवड आहे. यातील जवळपास 90 टक्के हापूस, 10 टक्के पायरी व केसर दरवर्षी सरासरी 47 हजार टनांहून अधिक उत्पादन तालुक्यातून बाहेर पडते. कोकणाची अर्थव्यवस्था व शेतकऱ्यांची घरची दिवाळी मोठ्या प्रमाणावर हापूसवर अवलंबून असते. मात्र यावर्षीच्या अनियमित वातावरणामुळे हा संपूर्ण चक्रच विस्कळीत होताना दिसत आहे.

आंबा झाडांवर ऑक्टोबर अखेरपासून नोव्हेंबरपर्यंत नैसर्गिकरित्या मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होते. परंतु यंदा सतत पावसाचे सत्र, ढगाळ वातावरण, वादळी वाऱ्यांचे प्राबल्य यामुळे डिसेंबरपर्यंत मोहोराची कोणतीही हालचाल दिसून येत नाही.

या उशिरामुळे पुढील तीन मोठे परिणाम होणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत जर मोहोर फेब्रुवारी-मार्चमध्ये आला, तर फळधारणा थेट जूनमध्ये होईल. जून-जुलैमध्ये ढगाळ वातावरण आणि पावसामुळे मावा, थ्रिप्स, हॉपर्स इत्यादी किडींचा प्रादुर्भाव कोळी, भुरटे, बुरशीजन्य रोग यांची शक्यता अत्यंत जास्त.

हवामान लहरीपणा कायम राहिला तर हंगामातील एकूण उत्पादन मोठ्या प्रमाणात ढगाळ अवकाळी पावसामुळे भातपीक-नाचणीचे नुकसान झालेला शेतकरी वर्ग अजून सावरलाच नाही; त्यात आता आंबा बागायतदारांचीही ‌‘रातभर झोप‌’ उडाली आहे. बागायतदार म्हणतात हापूस हा आमचा मुख्य आधार वातावरण असेच राहिले तर यंदाचा हंगाम हातची संधी जाईल.

कृषी तज्ज्ञांनी खालील सूचना दिल्या आहेत कि, बागेत पाण्याचा निचरा कायम ठेवणे झाडांच्या फांद्यांमध्ये हवा खेळती राहील याची काळजी प्रूनिंग मर्यादित प्रमाणात करण्ो,. रोगप्रतिकारक फवारणीचे नियोजन जमिनीतील ओल आणि तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी सेंद्रिय मल्चिंग यामुळे मोहोर प्रक्रियेतील पुढील नुकसान टाळता येऊ शकते.

हापूस निर्यात, व्यापारी, वाहतूक, पॅकिंग केंद्रे, मजूर वर्ग - सर्वच क्षेत्रांवर या परिस्थितीचा मोठा परिणाम होईल. उत्पादन कमी झाल्यास बाजारभाव वाढतील, परंतु शेतकऱ्यांच्या परिश्रमाला योग्य मोबदला मिळणे अनिश्चित राहील. अवकाळीने श्रीवर्धन तालुक्यातील कृषी रचनेला मोठी तडे दिली आहेत.

हापूस आंबा हा मुख्य आधार

जून-जुलैमध्ये ढगाळ वातावरण आणि पावसामुळे मावा, थ्रिप्स, हॉपर्स इत्यादी किडींचा प्रादुर्भाव कोळी, भुरटे, बुरशीजन्य रोग यांची शक्यता अत्यंत जास्त. हवामान लहरीपणा कायम राहिला तर हंगामातील एकूण उत्पादन मोठ्या प्रमाणात ढगाळ अवकाळी पावसामुळे भातपीक-नाचणीचे नुकसान झालेला शेतकरी वर्ग अजून सावरलाच नाही; त्यात आता आंबा बागायतदारांचीही ‌‘रातभर झोप‌’ उडाली आहे. बागायतदार म्हणतात हापूस हा आमचा मुख्य आधार वातावरण असेच राहिले तर यंदाचा हंगाम हातची संधी जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT