Mango Cashew Crop Loss Pudhari
रायगड

Mango Cashew Crop Loss: वाढत्या तापमानाचा रायगडात बागायतदारांना दुहेरी फटका; सरकारकडे नुकसानभरपाईचा प्रस्ताव

92 टक्के पंचनामे पूर्ण; भरपाईची प्रतिक्षा

पुढारी वृत्तसेवा

संतोष उतेकर

सुधागड: अवकाळी पाऊस सततचे ढगाळ वातावरण आणि वाढत्या तापमानाचा फटका यंदा आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. प्रतिकूल हवामानामुळे यंदा अपेक्षित उत्पादना पैकी केवळ 85 टक्के पीक हाती आल्याने जिल्ह्यातील बागायतांचे आर्थिक नुकसान झाले या पार्श्वभूमीवर शासनाने सरसकट पंचनामाचे आदेश दिले असून जिल्ह्यात आत्तापर्यंत 827 50 हेक्टर क्षेत्रांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

माहितीनुसार ते 30% पेक्षा अधिक नुकसान झालेल्या आंबा पिकाचे 7 124.03 हेक्टर इतर पिकांचे 703.53 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये हे पंचनामे केले असून एकूण 92% काम पूर्ण झाले आहे.

रायगड जिल्ह्या अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील श्रीवर्धन तालुक्यातील पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नाही हे काम सोमवार पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून त्यानंतर बाधित क्षेत्रात आणखी सुमारे 1200 हेक्टरची भर पडू शकते 15% आंबा पीक आंबा पिक येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी कोकणातील आंबा बागायतदारांनी आंदोलन ही केले होते.

प्रति हेक्टर 22000

नुकसानग्रस्त फळबागायतदारांना प्रति हेक्टर 22000 500 रुपये मदत देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे, तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना किमान प्रतिगुठा अडीच हजार रुपये मदत देण्याची तरतूद प्रास्तावित करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना जीआर अनुसार नुकसान भरपाई मिळणार आहे, एकूण 14 तालुक्यांचा आव्हान हाती आला असून आता हजार 827.50 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. सोमवार पर्यंत या संपूर्ण आकडेवारीचा अहवाल राज्य शासनाला पाठवण्यात येईल.
- वंदना शिंदे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय
जाहीर केलेली नुकसान भरपाई फारच कमी आहे, मोहोर गळून गेल्यानंतर दापोडी कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाने फक्त दहा टक्के आंबा काजू पीक येईल असा आव्हाल पाठवला होता भरपाईचा निर्णय करण्यात उशीर झाला.
- शरद गोळे, शेतकरी संघटना व आंबा उत्पादक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT