Mangaon Crime News: अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला अटक; हत्येचे कारण अस्पष्टच

या पथकांनी तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे तपास करत माणगाव तालुक्यातील घरोशीवाडी येथील रहिवासी शुभम उतेकर, वय 32, याला गुरुवारी सकाळी सात वाजता अटक केली.
Arrest
ArrestPudhari
Published on
Updated on

माणगाव: माणगाव तालुक्यात एका पंधरा वर्षीय निष्पाप मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून देण्याच्या अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मात्र माणगाव पोलिसांनी या प्रकरणात तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या चोवीस तासांच्या आत आरोपीला जेरबंद करत आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. या पथकांनी तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे तपास करत माणगाव तालुक्यातील घरोशीवाडी येथील रहिवासी शुभम उतेकर, वय 32, याला गुरुवारी सकाळी सात वाजता अटक केली.

Arrest
Uran Air Quality: कडक उन्हातही हवेच्या गुणवत्तेत सुधारणा; नागरिकांना मोठा दिलासा

उन्हाळ्याच्या सुट्टी निमित्त मुंबईहून आपल्या मूळ गावी आलेल्या या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. सोमवार ता. 25 मे रोजी रात्री सुमारे नऊ वाजता ही पंधरा वर्षीय मुलगी वडिलांचा मोबाईल घेऊन बोलत बोलत घराबाहेर पडली, परंतु त्यानंतर ती पुन्हा घरी परतलीच नाही. रात्री पासूनच तिचा शोध सुरू झाला.

अखेर बुधवार ता. 27 मे रोजी गावाजवळील एका निर्जन जंगल भागात तिचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावरील जखमांची तीव्रता पाहता ही हत्याच असल्याचा प्राथमिक निष्कर्ष माणगाव पोलिसांनी काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकालाही घटनास्थळावर पाचारण करण्यात आले आणि सखोल तपासाला सुरुवात झाली.

Arrest
Mumbai Crime: पत्नीशी संबंध ठेवणाऱ्या प्रियकराची दगडाने ठेचून हत्या

या गंभीर प्रकरणाची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस उपअधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चार विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकांनी तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे तपास करत माणगाव तालुक्यातील घरोशीवाडी येथील रहिवासी शुभम उतेकर, वय वर्षे 32, याला गुरुवारी सकाळी सात वाजता अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news