अवकाळीमुळे कर्जत-खालापुरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान pudhari photo
रायगड

Unseasonal rain crop damage : अवकाळीमुळे कर्जत-खालापुरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

जिल्ह्यातील पहिला ऊसपिक प्रयोग वादळात जमीनदोस्त

पुढारी वृत्तसेवा

नेरळ : आनंद सकपाळ

कर्जत तालुक्यात भातीची पारंपरिक लागवड होत असताना, कर्जत तालुक्यातील एका तरूण शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनीमध्ये ऊसाची लागवडही केली होती. त्याचा हा ऊस लागवडीचा प्रयत्न हा यशस्वी झाला होता. ऊस लागवडीची वाढ ही उत्तम प्रकारे झाली असताना, मात्र अवकाळी पावसाचा फटका त्या तरूण शेतकऱ्याने केलेल्या ऊसाच्या लागवडीला बसला आहे.

ऊस लागवडीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तर या तरूणाच्या ऊस लागवडीच्या यशवी मेहनत व प्रयत्नावर मात्र या अवकाळी पावासामुळे विरजण पडले आहे. कर्जत तालुक्यातील वाकस ग्रामपंचायत हद्दीतील कोलीवली गावातील तरूण शेतकरी मंगेश गणपत मिसाळ या तरूण शेतकरी यांनी कर्जत तालुक्यातील होणारी पारंपारिक भात पीकाची शेती न करण्याचा निर्णय घेत आपल्या सहा गुंठे शेतजमिनीमध्ये ऊस लागवडीचा निर्णय घेऊन, ऊस लागवड केली होती. त्याच्या या निर्णयाला यश आले आहे. ऊस लागवडमध्ये जोमाने वाढ होत असल्याची व ही उत्तम प्रकारे यशवी झाली होती.

पारंपरिक भात शेती न करता त्याच्या या यशस्वी ऊस लागवडीचा तालुक्यातील इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श देखील निर्माण झाला होता. मात्र सात मे रोजी मेघर्गजना व वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मात्र या तरूण शेतकऱ्याच्या ऊस लागवडीला फटका बसला आहे. ऊस लागवडीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तर या तरूणाच्या ऊस लागवडीच्या यशवी मेहनत व प्रयत्नावर मात्र या अवकाळी पावासामुळे विरजण पडले आहे.

वादळीवाऱ्यास झालेल्या अवकाळी पावसामुळे माझ्या ऊस लागवडीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात प्रशासन व शासनाकडून याकडे लक्ष देऊन तत्काळ पंचनामे करून मला नुकसानभरपाई द्यावी.
मंगेश मिसाळ, तरूण शेतकरी, कोलविली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT